मेल

काल मला पांथस्थ या शब्दावरून काहीतरी सुचत होतं.. मला कळतच नव्हतं की माझ्या मनात हा शब्द का घुमतोय.. तर आत्ता कळलं की ते तुझ्या कवितेवरून होतं…सांग कसं झालंय…
#विशालाक्षर
मी पांथस्थ..!
मनाचं बोट धरून कुठल्याशा विचारांच्या शोधात..देशातल्या संतांपासून ते पाश्चात्य तत्वज्ञांचे विचार इतके सुंदर आणि जड वाटले की, आभासी माध्यमात स्वतःचं वजन दाखवण्यासाठी सर्रास वापरून घेतले. माझे प्रतिष्ठेचे घोडे गंगेत न्हाऊन शुद्ध झाले बस.!
आयुष्याच्या कित्येक दुष्काळानंतरचा, तोच मी.. कोरडा..  अजूनही पांथस्थ… 
आताशा शोधतोय तत्वज्ञानाच्या आकाशात स्वतःचा असा पाणस्थ मेघ. त्याने धडधडत कोसळत राहावं मेंदूतून मनात आणि मनातून अंतःस्थ नेणिवेत. आजवरच्या शोधमोहिमेतली गंगोत्री तिथेच कुठेतरी गवसेल का?
वाचता वाचता आता एखादा तरी विचार जगावा म्हणतोय.
©विशाल पोतदार

5 june 2021 11:28