अंतर्भाव

मला लिहिता येत नाही
गीत वेदनेचे
बंधाऱ्याच्या पलीकडे मांडता येत नाही
शोक जीर्ण मृत शरीराच्या समाधीचे !
आक्रोशाच्या गिळंकृत ध्वनीतूनही
त्यांच्या देहाकडे बघून
आवाजाच्या ऐकू येतात कांठाळ्या
आणि किती अशा डोंगर कपारीच्या
चिरडून टाकणाऱ्या बातम्या !
सुन्न करते
ती कालची माणूस वस्ती
आज उध्वस्त होताना बघून
वाटतं…. पुन्हा , पुन्हा उभी राहिल
का इथे माणसं ??